लातूर, दि. 10 : वाढत्या संसर्गजन्य कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लातूर लातूर जिल्ह्यात दि. 1 ऑगस्टपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सदरील लॉकडाऊन येत्या दि. 13 ऑगस्टपासून शिथिल करण्यात येणार आहे. तर दि. 17 ऑगस्ट पासून पूर्णपणे मागे घेण्यात येणार असल्याचे माहिती जिल्हयाचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
देशमुख पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यात घोषित करण्यात आलेला लॉकडाऊन हा कोरोना व नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य सेवा व वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळीचा सल्ला घेऊनच लागू करण्यात आला होता. लॉकडाऊन दरम्यान कार्यरत असणाऱ्या यंत्रणांनी ट्रेस, टेस्ट आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा अवलंब केला होता याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. लॉकडाऊन उठल्यानंतर म्हणजेच दि. 17 ऑगस्टपासून टेस्ट, टेस्ट आणि टेस्ट ही कार्यपद्धती स्वीकारण्यात येणार आहे. याच्या अंमलबजावणीत सर्व नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. लातूर जिल्ह्यात कोविड-19 ला आळा घालण्यासाठी जिल्हा आणि शहरांच्या सीमांवर अधिक दक्षता बाळगण्याचे काम संबंधित यंत्रणा करणार आता करणार आहेत. जिल्ह्यात तसेच शहरात प्रवेश करणाऱ्यांच्या तपासण्या करण्यावर अधिक लक्ष द्यावे लागेल.
कोविड -19 चा प्रादुर्भाव इतक्यात संपणार नाही कदाचित यासाठी आणखी वर्षभराचा कालावधी लागेल असा अंदाज सर्वत्र व्यक्त केला जात आहे हे लक्षात घेतले तर सर्वांनाच काळजी घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत नागरिकांनीही आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून अधिक काळजी घ्यावी असे आवाहनही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment